चक्रीवादळात नुकसान झालेल्या पनवेल तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द



अलिबाग,जि.रायगड, दि. 17 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. 
या चक्रीवादळात नुकसान झालेल्या  पनवेल तालुक्यातील खैरवाडी गारमाळ येथील महादीबाई गोमा थोराड, पूर्णतः नुकसान रक्कम 1 लाख 56 हजार 100, पिंट्या मारुती थोराड पूर्ण नुकसान रक्कम रुपये 1 लाख 13 हजार 500, पोशा आंबो थोराड मध्यम नुकसान  रूपय 95 हजार 100, अंबो नामा थोराड मध्यम नुकसान रक्कम रुपये 39 हजार 100 असे एकूण 4 लाख 3 हजार 800 रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, पनवेल दत्तात्रय नवले, तहसिलदार, अमित सानप, नायब तहसिलदार, राहुल सूर्यवंशी, विजय कुमार साळवे, प्र.गटविकास अधिकारी, श्री. भोळे आदि उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक