ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर 2018 पर्यंत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका, सरपंच पदासह सर्व सदस्य् पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात रायगड जिल्ह्यातील 187 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत तर 158 जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत.
निवडणुक कार्यक्रम याप्रमाणे- निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे- शुक्रवार दि.27 एप्रिल. नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करणे- सोमवार दि 7 मे ते शनिवार 12 मे  2018 रोजी. सकाळी 11 ते दुपारी साडेचार वा.पर्यंत.नामनिर्देशन पत्रांची छाननी- सोमवार दि.14 मे रोजी सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)बुधवार दि.16 मे रोजी दुपारी तीन  वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ- बुधवार दि. 16 मे रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदान रविवार दि.27 मे रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत. मतमोजणी मतमोजणीचे ठिकाणी व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार सेामवार दि.28 मे रोजी. निवडणूकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक (ज्या ग्रामपंचायतींची मुदत दि.1 जून 2018 रोजी संपत आहे. अशा ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाची प्रसिद्धी मंगळवार दि.29 एप्रिल  ते गुरुवार दि.31 मे 2018 पर्यंत आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक