क्रीडा नैपुण्य चाचणी कार्यक्रम जाहीर


            अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत संपुर्ण राज्यात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचविण्यासाठी आणि राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी वैज्ञानिक पद्धती,अद्यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्याची गरज आहे. या उद्देशाने राज्यातील खेळ,परंपरा,अंत:सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि इंग्लिश मिडीयम शालेय शिक्षणासह बालेवाडी,पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना केली आहे.
            शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधीनी सुरू आहेत. या क्रीडा प्रबोधीनीमध्ये  ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्ट द्वारे निवड करून त्यांना विविध खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाद्वारे दिले जाते.या खेळाडूच्या निवास, भोजन,प्रशिक्षण,शिक्षण व इतर संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करते.
            शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत सन २०१८-१९ करीता विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये नवीन प्रवेश देण्यासाठी राज्यातील ८ ते १४ वयोगटातील शाळेत शिकत असलेल्या प्रत्येक मुला-मुलींच्या तसेच शाळेत शिकत नसलेल्या परंतू उत्कृष्ट शारिरीक क्षमता असलेल्या प्रत्येक मुला-मुलींच्या ) वजन ) उंची ) ३० मीटर भरधाव धावणे ) ८०० मीटर धावणे ) x १० मी. शटल रन ) उभे राहून लांब उडी ) उभे राहून उंच उडी ) मेडीसीन बॉल थ्रो ) लवचिकता या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे बॅटरी ऑफ टेस्ट चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्याद्वारा  करण्याचे निश्चित झालेले आहे. तालुकास्तर क्रीडा नैपुण्य चाचण्या आयोजनाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे
१)     दि.२६ रोजी तालुका क्रीडा संकुल,पेण, श्री.प्रकाश म्हात्रे ९२७०९१६०८९
२)     दि.२७रोजी सुंदरराव मोरे कॉलेज,चोळई,पोलादपुर, श्री.किसन सुरवसे ८३९०६३२००९, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,महाड, श्री.साळवी व श्री.समीर गाडगीळ ९८२२६६६५६७, आश्रमशाळा वावळोली, सुधागड ,श्री. थळे ८०८७४३००४६,
जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली,अलिबाग,श्री.यतीराज पाटील ९९२११७१७००,
अ.स.ई.अंतुले हायस्कुल,दिघी,श्रीवर्धन, श्री.मुंढे ८२७५२६६६२७,
एच.ओ.सी. स्कुल, रसायनी, खालापुर, श्री आशिष धायडे ९७६४९९०९३२,
भाऊसाहेब राऊत हायस्कुल,चिंचवली डिकसळ,कर्जत, श्री किशोर पाटील ९९२३५६१४५४ व श्री समीर येरूणकर ९४०५७५३६८०,
नेटिव्ह इन्स्टीट्युशन,उरण, श्री.जी.बी.पाटील व  श्री. भुषण झोपे ८१०८९२८७१५
३)     दि.२८ रोजी सर एस.ए.हायस्कुल,मुरूड, श्री.पांडुरंग आरेकर ८५५१०६३४१७, ए.आय.जे.हायकुल, म्हसळा, श्री.बिजापुरे ९२२६२७९२३७ , अशोक ल. लोखंडे हायस्कुल,तळा, श्री. अरूण खुळपे ७५०६९१८९२७, नवजीवन हायस्कुल,तळाशेत,माणगाव, श्री. विठ्ठल खटके ९६६५२८५४२१, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल, श्री. समीर रेवाळे ९७६६२३५२५०
क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरीता सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी आपल्या तालुक्यात आयोजीत होणाऱ्या  चाचण्यांकरीता आपल्या शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी ८ वा. उपस्थित रहावे. जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन दि. ५ मे, २०१८ रोजी जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली, अलिबाग येथे होणार आहे.
गटनिश्चिती-
१) १४ वर्षे वयोगट- जन्मतारीख दि.०१/०७/२००४ किंवा तद्नंतरची असावी.
२)१३ वर्षे वयोगट- जन्मतारीख दि.०१/०७/२००५ किंवा तद्नंतरची असावी.
३)१२ वर्षे वयोगट- जन्मतारीख दि.०१/०७/२००६ किंवा तद्नंतरची असावी.
४)११ वर्षे वयोगट          - जन्मतारीख दि.०१/०७/२००७ किंवा तद्नंतरची असावी.
५)१० वर्षे वयोगट- जन्मतारीख दि.०१/०७/२००८ किंवा तद्नंतरची असावी.
६)०९ वर्षे वयोगट- जन्मतारीख दि.०१/०७/२००९ किंवा तद्नंतरची असावी.
७)०८ वर्षे वयोगट          - जन्मतारीख दि.०१/०७/२००१० किंवा तद्नंतरची असावी.
अधिक माहिती करिता  जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयाशी तसेच श्री.विशाल गर्जे ( राज्य क्रीडा मार्गदर्शक) ८०८७०७६६३३, ८४५१८३११९९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा  अधिकारी रायगड यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक