सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती; 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 25 :-सन 2017-18 मघ्ये इयत्ता 10 वी  12 वी व पदवी/पदविका परिक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणाऱ्या तसेच विद्यापिठाने मान्य केलेल्या विषयांमघ्ये संशोधनपर अभ्यासक्रम करणाऱ्या (पीएचडी व तत्सम) माजी सैनिक,विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृती देण्यात येणार आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक,माजी सैनिक विधवांनी 1) वैयक्तिक अर्ज. 2) डी डी-40 अर्ज (कार्यालयात उपलब्ध आहे.). 3) ओळखपत्राची पाठपोठ छायांकित प्रत. 4) ध्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड सर्टीफिकेट. 5) उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रिकेची प्रमाणित सत्यप्रत. 6) डिसचार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानांची प्रमाणित छायांकित प्रत. 7) इतर कोणतीही शिष्यवृती मिळत नसलेबाबतचा कॉलेजचा दाखला.या कागदपत्रासह आपले अर्ज दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावेत. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक