जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे चित्रकला स्पर्धा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.23 : स्त्रीभ्रूण हत्या थांबविणे,माहिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे याबाबत  मुलांमध्ये याबाबत प्रबोधन व्हावे यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी जिल्हा स्तरावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ तथा ‘लेक वाचवा लेक‍ शिकवा’ या विषयांवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दि.23 ते 25 जुलै 2018 या कालावधीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ही पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटात विभागून आयोजित करण्यात आली आहे.   प्रत्येक तालुक्यातील तीन उत्कृष्ट चित्रांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल असे जयदीप ज.मोहिते, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक