अनुसूचित जाती,जमाती आयोग यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)25- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे (भा.पो.से.), मा.न्यायमूर्ती सी.एल.थूल, सदस्य (विधी) मधुकर गायकवाड, सदस्य (सेवा) रमेश शिंदे, संपर्क अधिकारी  हे   जिह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.30 रोजी मुंबई येथून दुपारी सोडतीन वा. वाहनाने रायगड (अलिबाग)कडे प्रयाण.   सायंकाळी साडे सात वा. रायगड (अलिबाग) येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम .  
मंगळवार दि.31 रोजी सकाळी 11 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड विभागातील अनुसूचित जाती, जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक योजना तसेच अनुसूचित जाती, जमाती भरती, बढती,अनुशेषबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आढावा बैठक. दुपारी साडेबारा वा.जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याबरोबर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा तसेच जिल्ह्यामध्ये नागरी हक्क संरक्षण, अन्याय,अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा व लाभार्थ्यांना देण्यात आलेली आर्थिक मदतीबाबत आढावा बैठक.  दुपारी दोन ते तीन आरक्षित.  सायं.सोईनुसार मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक