सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना पुरस्कार



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 25 :-शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी  बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करूण उत्तीर्ण झालेले माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. . पाटकर विशेष गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
        सदरील पुरस्कार प्राप्त करण्यासाठी माजी सैनिक विधवांनी 1) माजी सैनिक विधवेचा हस्तलिखित अर्ज. 2) डी डी 40 फॉर्म.  3) माजी सैनिक विधवा ओळखपत्र.  4) एस एस सी/एच एस सी बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत.  5) एस एस सी/ एच एस सी बोर्डाच्या गुण पत्रकाची छायांकित प्रत ही कागदपत्रे दिनांक  15 सप्टेंबर   पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक