राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची प्रवेश पात्रता परीक्षा 1 व 2 डिसेंबर रोजी


          अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.26-  राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय डेहराडून (उत्तरांचल) येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनाक 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2019 रोजी अकरा वर्ष सहा महिने पेक्षा कमी तेरा वर्षापेक्षा अधिक नाही (म्हणजेच जन्म दिनांक 2 जुलै 2006 ते 1 जानेवारी 2008 या कालावधीत असावा)  असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र समजण्यात येतील.  विद्यार्थी दिनांक 1 जुलै 2019 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता सातवी या वर्गात असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. 
            परीक्षेसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तरांचल 248003 यांच्याकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्रे घ्यावयाची आहेत.  विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती, जमातीसाठी रुपये 555/- (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांनी रुपये 600/- चा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे.  सदर ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच कमांडंट आर.आय.एम.सी.डेहराडून यांचे नावे काढावा.  ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक Code No.01576) अशी नोंद करावी. आवेदनपत्र माहितीपत्र व मागील पाच वर्षाचे प्रश्नपत्रिका संच ड्राफ्ट पाठविल्यानंतर कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराचंल 248003 यांच्याकडून पोस्टाने पाठविण्यात येतील. परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे 30 सप्टेंबर 2018 पर्यंत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे-411001 यांच्याकडे पोहचतील अशाप्रकारे  स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जाऊन जमा करावीत.  त्यानंतर आलेली आवेदनपत्रे कोणत्याही  परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाहीत.  आवेदपत्र दोन प्रतीत भरणे आवश्यक  आहे.  त्यासोबत जन्मतारखेच्या, जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती, जमातीसाठी) छायांकित एक प्रत, आदिवासी दाखल्याची सत्यप्रत (Domicile Certificate) जोडणे आवश्यक आहे.  तसेच शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळप्रत जोडणे आवश्यक आहे.  
            परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील.  परीक्षार्थींना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल.  गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी, हिंदी या भाषेत उपलब्ध होतील.  लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 4 एप्रिल 2019 रोजी घेण्यात येतील, असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक