आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 

रायगड,दि.23(जिमाका):-मा.भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. 32- रायगड /33 मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

विधानसभा मतदार संघ- 188 पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक 022-27452399, 189-कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक 9373922909, 190-उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक 9892538409, 191-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक 02143. 253032, 192- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक 02141-222042, 193- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक 02147-222226/7249579158, 194-महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक 7385815210, 263- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक 02352-226248,264- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक 02356-264888

त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. 1950 असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. 02141-222097 हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती 32- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड