32-रायगड लोकसभा निवडणूक-2024 उमेदवारांच्या खर्च विषयक तक्रारीचे निवारण व भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याच्या कार्यवाहीसाठी समित्या गठीत

 

 

रायगड,दि.23(जिमाका):-आगामी लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांच्या खर्च विषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी खर्च नियंत्रण समित्ती गठीत करण्यात आली असून या खर्च नियंत्रण समितीमध्ये  श्री.धिरेंद्र मनी त्रिपाठी, खर्च निरीक्षक (अध्यक्ष), श्री.किशन जावळे (भा.प्र.से.), जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड, श्री.राहुल केशय कदम, खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांच्या खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यासाठी उमेदवारांना पुढीलप्रमाणे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे.

तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे

 पहिली तपासणी- दि.25 एप्रिल 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00.

दुसरी तपासणी- दि.30 एप्रिल 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00.

तिसरी तपासणी-दि.04 मे 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 होणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचार मोहिमेच्या कालावधीतील सर्व लेखे/खर्चाच्या नोंदवह्या अद्ययावत करून नमूद केलेल्या तारखांना राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे तपासणीसाठी सादर करावेत.

जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही  समिती

आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांची भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. श्री. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, श्री.राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, श्री.देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य

ही समिती उमेदरावांच्या जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही असे दिसून आल्यास अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तूनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर ही रक्कम उमेदवारास परत करण्याची कार्यवाही करेल.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक