'ट्राय'च्या कार्यशाळेत ग्राहकांना दुरध्वनी सेवांची माहिती



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.23-टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी आज भाग्यलक्ष्मी मंगळ कार्यालय, अलिबाग येथे ग्राहक जागरुकता  कार्यक्रम आयोजित केला होता.  स्वत:च्या हक्क व अधिकारांची नागरिकांना माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन ट्रायच्या बंगळूर कार्यालयातर्फे करण्यात आले होते.   यावेळी विविध दूरसंचार सेवांची माहिती व त्यासंदर्भातील ग्राहकांचे अधिकार, हक्क याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
 या कार्यशाळेस कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास एस.गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  कर्नाटक केरळ क्षेत्राचे सल्लागार यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या भूमिका व कार्यपध्दती तसेच दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंदर्भात आतापर्यंत घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली.  या कार्यक्रमामध्ये ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  तसेच दूरध्वनी सेवा पुरविणारे शासकीय अधिकारी व संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य तसेच स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या.  कार्यक्रमा दरम्यान दूरध्वनी संबंधित मोबाईल नंबर पोर्टबिलाटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्याधारीत सेवा, तक्रार नोंद कार्यपध्दती, टेरिफ इत्यादी बद्दल ट्रायच्या नियमांवर  प्रकाश टाकरण्यात आला. 
यावेळी माहिती देण्यात आली की, कोणत्याही तक्रारी अथवा सेवा, विनंती संदर्भात सेवा घेणाऱ्या व्यक्तीला ग्राहक दक्षता केंद्राशी संपर्क करावा लागतो.  त्यानंतर तक्रार नोंदवली जाऊन त्या तक्रारीची विस्तारीत माहिती जसे तक्रार क्रमांक, दिनांक, वेळ  तक्रार निवारण्यासाठी लागणारा वेळ ही माहिती एसएमएसद्वारे ग्राहकाला दिली जाते.  जर ग्राहक तक्रार निवारणाबाबत समाधानी नसेल तर तो उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतो.  यासाठी ग्राहक www.tccms.gov.in या संकेतस्थळाचा वापर करु शकतात.  या संकेत स्थळावर ग्राहक दक्षता केंद्र, सर्वसाधारण  माहिती, तक्रार केंद्र, उच्च अधिकारी सर्वांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकाला त्याच दूरध्वनी क्रमांकावर सेवा पुरविणारी कंपनी बदलायची झाल्यास ग्राहक पीओआरटी दहा आकडी मोबाईल क्रमांक हा एसएमएस 1900 या क्रमांकावर पाठवू शकतो.   यासाठी युपीसी कोडची मुदत ही पंधरा दिवसांसाठी राहील.
मूल्यवर्धित सेवा देताना सेवा पुरविणाऱ्या कंपनी ग्राहकांकडून दोनदा खात्री करुन घेतल्याशिवाय करु शकत नाहीत.  शिवाय ग्राहकाला नको असलेली सेवा सुरु झाल्यास ती बंद  करण्यासाठी मोफत क्रमांकाची सुविधा कंपनीने ठेवणे बंधनकारक आहे.  त्याचा शॉर्ट कोड 155223 असा आहे.  त्यावर ग्राहक एसएमएस करु शकतात.  अनावश्यक व नको असलेले व्यावसायिक जाहिरात संदेश बंद करण्यासाठी ग्राहक 1909 या क्रमांकावर एसएमएस किंवा फोन  करु शकतो.  दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्या दर सहा महिन्याला आपला टेरिफ प्लॅन दोन प्रसिध्द वर्तमान पत्रात छापून आणणे बंधनकारक आहे. यातील एक वर्तमानपत्र इंग्रजी भाषेतील व दुसरे क्षेत्रीय वर्तमानपत्रात प्रसिध्द करतील.  एखाद्याला नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणेसुध्दा बंधनकारक आहे. 
फोन सेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम जाहिर केले आहेत.  प्रीपेड सेवेमध्ये  नव्वद दिवसापेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करु शकत नाही.  ग्राहकाच्या फोन खात्यात कमीत कमी रुपये वीस किंवा त्याहून अधिक जमा असल्यास ही सेवा बंद करता येणार नाही.  मोबाईल डिस्क्नेक्ट झाल्यावर पुन्हा सेवा सुरु करण्यासाठी पंधरा दिवसाचा अधिक कालावधी देण्यात यावा.  दूरध्वनी सेवेप्रमाणेच केबल टी व्ही नेटवर्कच्या डीजिटायजेशन बाबतही यावेळी माहिती देण्यात आली.  मार्च 2017 पर्यंत ते डिजिटल केबल टिव्ही संक्रमण असेल.  यामुळे ब्रॉडबॅन्डस अनेकविध मूल्यवर्धित सेवा ग्राहकाला उपलब्ध होऊ शकतील.  केबल ऑपरेटरकडेही यासबंधी तक्रार निवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे.  या सेवेच्या फायद्याविषयी चर्चा झाली. 
बंगळूरच्या क्षेत्रीय कार्यालयाचे संयुक्त सल्लागार सी.एम.चानण आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी के.मुरलीधर यावेळी उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक