उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई आज रायगडमध्ये




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- उद्योग व खनिकर्म मंत्री  ना.सुभाष देसाई, हे  आज रायगड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 23 मार्च रोजी रात्रौ आठ वा.तीस मिनिटांनी नवी मुंबई येथून मोटारीने माणगांवकडे (जि.रायगड) प्रयाण. रात्रौ दहा वाजता माणगांव येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि.24 मार्च  रोजी सकाळी नऊ वाजता माणगांव येथून मोटारीने श्रीवर्धनकडे  प्रयाण. दहा वाजता श्रीवर्धन येथे आगमन. दहा वा.तीस मिनिटांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बैठक. स्थळ: दर्या रेस्ट् हाऊस, श्रीवर्धन. अकरा वाजता मेळावा. स्थळ: नगर परिषद कार्यालयाजवळ, श्रीवर्धन. दुपारी दोन वाजता मोटारीने माणगांव जि. रायगडकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता माणगांव येथे आगमन व राखीव. सायंकाळी चार वाजता माणगांव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.  
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक