दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, महाड या न्यायालयाचे उद्या होणार उद्घाटन


 

रायगड (जिमाका) दि.25:- दिवाणी न्यायालयवरिष्ठ स्तरमहाड या न्यायालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्तीजिल्हा रायगड  रियाज इ.छागला यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उच्च न्यायालयमुंबई तथा पालक न्यायमूर्तीजिल्हा रायगड मिलिंद म.साठये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशरायगड-अलिबाग अजेय श्री. राजदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

भूसंपादन प्रकरणेहिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल होणारी प्रकरणेसरकार विरुध्दची प्रकरणेरक्कम रुपये पाच लाखावरील दावे व इतर प्रकरणांसाठी महाड व पोलादपूर या महसुली तालुक्यांकरीता पक्षकार व वकीलांना प्रकरणे दाखल करण्यासाठी अलिबाग येथे यावे लागत होते. त्यामुळे पक्षकारांना आर्थिक भुर्दंड पडत होता तसेच त्यांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे या परीसरातील पक्षकार व वकीलांची महाड येथे दिवाणी न्यायालयवरिष्ठ स्तर हे न्यायालय सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती.

महाड व पोलादपूर या महसुली तालुक्यांकरीता महाडजिल्हा रायगड येथे दिवाणी न्यायाधीशवरिष्ठ स्तरमहाड यांचे न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून त्याबाबतची अधिसचना विधी व न्याय विभागमंत्रालयमुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आली आहे. या नतन न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पी.एम.उन्हाळे यांची मा.उच्च न्यायालयाकडून नियुक्ती करण्यात आली आहे महाड येथे दि. 26 ऑगस्ट पासून दिवाणी न्यायालयवरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे, असे जिल्हा न्यायालय, रायगड-  अलिबाग यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक