माजी सैनिक/माजी सैनिकांच्या पत्नींसाठी एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन

 

 

रायगड (जिमाका),दि.22:- खारघर, कामोठे, तळोजा व पनवेल परीसरामधील माजी सैनिक/माजी सैनिक पत्नी  यांच्या  अडीअडचणी  तसेच  विविध  कार्यालयीन  कामाकरिता मंगळवार, दि.29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.00 वा जल वायू विहार, खारघर येथे एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचा लाभ खारघर, कामोठे, तळोजा व पनवेल परीसरामधील माजी सैनिकांनी घ्यावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (नि.)ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.  

या मेळाव्यामध्ये माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांची ओळखपत्रे बनविणे व वाटप करणे, अवलंबितांची ओळखपत्रे, घरपट्टी प्रमाणपत्रे वितरीत करणे, पेंशनबाबत विवीध कामे  इत्यादी कामांकरीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  मेळाव्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (नि.) ले.कर्नल राहुल वैजनाथ माने, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गोविंदराव मारुति साळुंखे, व कल्याण संघटक पुरुषोत्तम चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक