अनुकंपा प्रतिक्षा यादी प्रसिध्द 25 जुलै पर्यंत हरकती मागविल्या



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट- क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाच्या व जिल्हा संकेतस्थळ www.raigad.nic.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे.    सदर यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत,आक्षेप असल्यास उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज दि.25 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.  दि.25 जुलै नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद् मश्री बैनाडे यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक