माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन वास्तूचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14-  माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि.१३) करण्यात आले.
माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव या नूतन इमारतीचे ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. आमदार भरतशेठ गोगावले हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या कार्यक्रमास कृष्णा कोबनाक, संस्थापक ॲड. राजीव साबळे सेक्रेटरी कृष्णा  दोशी, स्कूल कमिटी चेअरमन राजनभाई मेथा, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, माणगाव पं.स. सभापती सुजित शिंदे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रा.जि.प सदस्या अमृता हरवंडकर, माणगाव उपनगराध्यक्षा शुभांगी जाधव, नगरसेविका स्नेहा दसवते, नीलम मेहता, माजी  उपसरपंच नितीन दसवते, नगरसेवक सचिन बोंबले, स्वीकृत नगरसेवक नितीन बामुगडे, प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकवर्ग पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी  बोलताना ना. रवींद्र चव्हाण यांनी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे खास कौतुक केले.
         यावेळी आमदार भरत गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविकात संस्थापक राजीव साबळे यांनी संस्थेची इत्यंभूत माहिती दिली.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक