मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम नवमतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी --प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20-  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा नवमतदार व  वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दि.1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर  (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण  कार्यक्रमाविषयी माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार तसेच पत्रकार उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना प्र.जिल्हाधिकारी श्री.हळदे म्हणाले की, जास्तीत जास्त मतदारांना मतदार नोंदणी करता यावी यासाठी रविवार दि.21 जुलै 2019, शनिवार दि.27 जुलै 2019 व रविवार दि.28 जुलै 2019 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.  या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी हे नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्याकरिता उपस्थित राहणार आहेत. तसेच नागरिकांना मतदान यादीतील नाव तपासणीसाठी दि.1 जानेवरी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिध्द करण्यात आलेली अंतिम मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.   
मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सोमवार दि.15 जुलै. 2019  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि.15 जुलै ते मंगळवार 30 जुलै. 2019   विशेष मोहिमेचे दिनांक शनिवार दि. 20 जुलै 2019 रविवार दि.21 जुलै 2019  शनिवार दि.27 जुलै 2019 रविवार दि.28 जुलै 2019  दावे व हरकती निकाली काढणे मंगळवार दि.13 ऑगस्ट 2019 पर्यंत.    अंतिम मतदार यादी प्रसिध्दी  सोमवार दि.19 ऑगस्ट 2019 रोजी असणार आहे.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने सदर कार्यक्रम महत्वाचा आहे.  ज्या पात्र नागरिकांचे, दिव्यांग व्यक्ती, महिला विशेषत: तरुण वर्गाचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही अशा सर्व नागरिकांनी विशेष पुन:रिक्षण कार्यक्रमामध्ये आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक