धरमतर खाडीजवळ अनधिकृत रेती उत्खनन, वाहतुकीवर कारवाई


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18-  धरमतर ता. अलिबाग येथील खाडीतून अनधिकृत वाळू उत्खनन, साठा व वाहतुक केल्याप्रकरणी अलिबाग तहसिल कार्यालयाने कारवाई करुन  सव्वा दोन लक्ष रुपयांचा महसूल  शासन जमा केला आहे. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना कळविण्यात आले आहे.
 याबाबत तहसिलदार अलिबाग यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, पोर्ट इन्स्पेक्टर  यांच्या सहकार्याने  खाडी पात्रात रेती उत्खनन करणाऱ्या बोटी व सक्शन पंपावर कारवाई करण्यात आली.  याठिकाणी जमा रेतीसाठा जप्त करुन लिलाव करण्यात आला व प्राप्त 2 लाख 25 हजार रुपये शासन जमा करण्यात आले. कारवाई प्रसंगी सापडलेले बेवारस दोन सक्शन पंप व दोन बोटी  काढता येणे शक्य नसल्याने  छिद्रे पाडून बुडवण्यात आल्या. तसेच वाळी साठा करण्यासाठी तयार करण्यात आलेले कुंडे नष्ट करण्यात आले आहेत. यासंदर्भात वडखळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून  रेती वाहतुकीसाठी वापरला जाणारे वाहन व वाहन चालक- मालकाविरुद्ध कारवाई करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना कळविण्यात आले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक