जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना : अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-राज्यातील जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना  दि.2 जानेवारी 2018 रोजी सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी गट, बेरोजगार संस्था यांना  अर्ज करावयाचा असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा https://eme.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
 यासंदर्भात शासन निर्णयान्वये राज्यात जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद  संधारणची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण,शेतकरी उत्पादन संस्था,नोंदणीकृत शेतकरी गटास, बेरोजगाराच्या सहकारी संस्था,विविध कार्यकारी संस्था यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्र सामुग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्था कडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व  शासन तर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत राहील.रायगड जिल्ह्यासाठभ्‍ 15 लाभार्थी निवडीचे उद्ष्टि दिलेले आहे. लाभार्थी यांचेकडे स्वत:ची मालकाची यंत्रसामुग्री नसावी. तसेच स्वत:चा हिस्सा किमान 20 टक्के रक्कम उभारणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे राहील-
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी उत्पादक कंपनी,बेरोजगारांच्या सहकारी संस्था,नोंदणीकृत गट शेती,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था.
लाभार्थी निवड समिती-
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निवड करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आहे . या समितीमध्ये पदाधिकारी पुढीलप्रमाणे- जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी रायगड अलिबाग हे अध्यक्ष आहेत. तरी कार्यकारी अभियंता,लघुसिंचन (जलसंधारण) तथा जिल्हा संधारण अधिकारी, रायगड अलिबाग- हे सदस्य आहेत तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड हे सदस्य सचिव आहेत.
            या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. तद्नंतर प्राप्त ऑनलाईन अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये करण्यात येईल. पात्र प्रस्ताव महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळास सादर करण्यात येतील.
जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेची माहिती https://eme.mahaonline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा, असे आवाहन बी.बी.शेळके,अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हा अधिक्षक,कृषि अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी, रायगड अलिबाग व पी.एम.खोडका, सदस्य सचिव, जिल्हा स्तरीय समिती तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, रायगड यांनी केली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक