सैनिकी वसतिगृहात अधिक्षक पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदभरती माजी सैनिकांना आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड  कार्यालयाच्या अखत्यारित सैनिकी मुलांचे वसतिगृह महाड येथे  वसतिगृह अधिक्षक या पदावर  रु. 12 हजार 872  इतक्या एकत्रित मासिक मानधनावर निव्वल तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात येणार आहेयासाठी सैन्यातून  नायब सुबेदार व पुढील हुद्दयावरुन निवृत्त झालेले माजी सैनिक व त्यासाठी शैक्षणिक अर्हता एस.एस.सी. पास असलेल्यांनी आपल्या बायोडाटयासह अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग येथे स्वहस्ते किंवा कार्यालयाची ई-मेल आयडी www.raigad@mahasainik.com  वर तात्काळ सादर करावेत. असे आवाहन मेजर प्रांजल प्र. जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक