जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक : विहित मुदतीत निधी खर्च करा-जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उप वनसंरक्षक मनिष कुमार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड विश्वनाथ सातपुते, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग आर.एस.मोरे, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र श्रीम.देवराज तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांचा खर्चाचा आढावा घेतला. विहित मुदतीत जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च झाला पाहिजे अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या. ज्या विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी प्रलंबित असतील त्यांनी पाठपुरवाठा करुन तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मंजूऱ्या मिळवाव्यात. जिल्हा नियोजन समितीचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश डॉ.सुर्यवंशी यांनी यावेळी दिले.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक