मृद व जलसंधारण कामांसाठी मशिनधारकांची नोंदणी


 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- रायगड जिल्ह्यातील मृद व जलसंधारण काम करण्यासाठी इच्छुक मशिनधारकांचा नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड  यांचेकडे करावयाची आहे तरी नोंदणीकृत मशिनधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदारांप्रमाणे  मृद व जलसंधारणाची काम करण्यासाठी ई-निविदा प्रक्रीयेत सहभागी होता येईल. मशिनधारकांचे नोंदणी दिनांक 19 जानेवारी 2018 पासून सुरु होणार  असल्याचे मार्च 2018 अखेर मृद व जलसंधारणाचा काम पूर्ण करावयाची असल्याने इच्छुक मशिनधारकांनी   तात्काळ नोंदणी करुन या योजनेची लाभ घ्यावा.
मशिनधारकाची पात्रता-
मशिनधारक महाराष्ट्रातील रहिवासी असावा. स्वताच्या मालकीची Excavator Brochoe Loader excavator या प्रवर्गामध्ये असणारी तत्सम मशिनरी व इतर असावी. एका आर्थिक वर्षात कामाच्या उपलब्धतेनुसार  एक  मशिनधारक 50 लाखाचे मर्यादेत काम मिळण्यास पात्र असेल, अशा नोंदणीकृत मशिनधारकास फक्त  नाला बांध व वळण बंधारा वगळून अन्य मृद व जलसंधारण कामामध्ये कंत्राटदार म्हणून भाग घेता येईल, कृषी यंत्रणेमार्फत होत असलेले सिमेंट नालाबांध व वळण बंधाऱ्यास काम घ्यावयाचे झाल्यास मशिनधारकास सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदणी अनिवार्य राहील. ई-निविदेतील अटी व शर्तीनुसार कामे न झाल्यास नोंदणीकृत मशिनधारकास काळ्या यादीत टाकण्याचा अधिकार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना राहील. नोंदणी शुल्क म्हणून प्रत्येक मशिनसाठी   रक्कम रु.पाच हजार  धनाकर्ष धनादेशाद्वारे नोंदणी अर्जासोबत जमा करावी. नोंदणी शुल्काचा धनाकर्ष धनादेश जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड अलिबाग यांच्या नावे काढण्यात यावा., नोंदणी शुल्क हे  ना परतावा असेल. नोंदणीधारकाने त्यांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, जीएसटी क्रमांक, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक तसेच आर.सी.बुक, टी.सी.बुक, विमा पॉलिसी आयकर भरणाप्रमाणपत्र व तत्सम कर भरणा प्रमाणपत्र इ. च्या सत्यप्रती नोंदणी फॉर्म  जोडणे आवश्यक आहे. यंत्रधारकांची नोंदणी करण्यासाठी अर्जाची प्रत जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक