महाड येथे शनिवारी कोकण इतिहास परिषदेचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- कोकण इतिहास परिषदेचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महाड येथे शनिवार दिनांक 20 व  रविवार दि.21 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशाचे उद्घाटन दि.20 रोजी मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ.विष्णू मगरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड, बौध्द वाड्:मय व पालीभाषा तज्ज्ञ डॉ.मीना तालीम, जनरल नेटीव्ह लायब्ररी चिपळूण चे अध्यक्ष प्रकाश देशपाडे, सत्राध्यक्ष, अस्मिता कॉलेज विक्रोलीचे प्राचार्य डॉ.एच.एस.गोरगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र इंदिरा गांधी जनजातीय राष्ट्रीय विश्वविद्यालय मध्यप्रदेशचे अध्यासन प्रमुख डॉ.किशोर गायकवाड, एस.एम.डी.एल. कॉलेज कळंबोलीचे प्राचार्य डॉ.सुधाकर लहुपचांग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे अधिवेशन चार सत्रात होणार आहे. पहिले सत्र शनिवार दि.20 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1.30 स्वागत, मान्यवरांचे मार्गदर्शन, पुस्तक प्रकाशन, जीवन गौरव पुरस्कार, पुरस्कार वितरण, प्रदर्शन उद्घाटन. दुसरे सत्र दुपारी 2.30 ते 5 वा. शोधनिबंध वाचन. तिसरे सत्र रविवार दि. 21 रोजी सकाळी 10 ते 1.30 वा. शोधनिबंध वाचन. चौथे सत्र दुपारी 2.30 ते 4 वा. समारोप.
जिल्ह्यातील इतिहास प्रेमींनी व नागरीकांनी या अधिवेशान लाभ घ्यावा असे आवाहन कोकण इतिहास परिषदेच्या संयोजन समिती डॉ.धनाजी गुरव, प्राचार्य, डॉ.अजय धनावडे, प्र.प्राचार्य एम.एम.जगताप कॉलेज, डॉ.प्रगती पाटील, समन्वयक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, डॉ.सुधाकर जाधव, प्रा.युवराज जाधव, प्रा.नितीन सुरवसे, प्रा.विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक