विनामूल्य युवा प्रशिक्षण शिबीर गुरुवारपासून मुंबई येथे नाव नोंदणी करण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- राज्यस्तरीय युवा प्रशिक्षण केंद्राच्या मुंबई विभागामार्फत दहा दिवसीय निवासी राज्य युवा प्रशिक्षण शिबीर न्युझलँड होस्टेल, आरे वसाहत, गोरेगाव पुर्व , मुंबई येथे दि. १८ ते २७ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरासाठी जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या ५० युवक/युवतींना विनामुल्य प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये प्रवेश दिलेल्या युवक व युवतींची निवास व भोजन व्यवस्था आयोजन समितीच्यावतीने विनामूल्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या युवक/युवतींना प्रशिक्षण शिबीरात सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी दि. १७ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली संगम,अलिबाग येथे क्रीडा अधिकारी विशाल बोडके (९८९०९१९२९७) यांचेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.महादेव कसगावडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक