राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास शनिवारपर्यंत मुदत वाढ


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- देशातील  शैक्षणिक संस्थामध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवार दि.20 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
लाभाचे स्वरुप तसेच अटी व शर्ती:- शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क,परिक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क इत्यादी देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील अनूसूचित जाती, नवबौद प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या अकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल-कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.सहा लाखापेक्षा कमी असावे.
शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात जागे अभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसतिगृह व भोजन शुल्क देण्यात येईल- पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी असेल.
वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे निर्वाहभत्ता देण्यात येईल-अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असला पाहिजे. तथापी त्या पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतील परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास करण्यात येईल.   
प्रवेशीत अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु.पाच हजार व शैक्षणिक साहित्य् आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु. पाच हजार असे एकूण रु.दहा हजार प्रत्येक वर्षी देण्यात येईल- विद्यार्थी इ.दहावी व बारावी ची परिक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
पदवी अभ्यासक्रमासाठी इ.बारावी च्या परिक्षेमध्ये किमान 55 टक्के गुण असावेत. तसेच शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थामधील अभ्यासक्रमासाठी लागू राहील. संस्थांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध. शिष्यवृत्ती  मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनास राहिल.  निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना  मिळावा यासाठी दि.20 जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज पाठवावे. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in/career व https://sjsa.Maharashtra.gov.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण रायगड अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक