युवा प्रशिक्षण शिबीर 24 पासून मुंबईत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- देशातील युवकांना सक्षम बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची  ओळख व्हावी म्हणून  राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या युवा प्रशिक्षण केंद्रात दि.24 मे पासून 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या विनामूल्य प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवकांनी दि.17 रोजी जिल्हा क्रीडा संकूल नेहुली संगम, अलिबाग येथे  क्रीडा अधिकारी विशाल बोडके 9890919297 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक