वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपण्याआधी किमान 15 दिवस आधी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्याशी संपर्क साधून आपल्या वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सादर करुन ती रितसर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईटमेंट घेऊन वाहन  तपासणी साठी मौजे जिते, ता.पेण, जि.रायगड येथे हजर करावे. अन्यथा मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि.रायगड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक