आपत्ती प्रसंगी प्रतिसादास सर्वोच्च्च प्राधान्य द्या - निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे




 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-  कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही हे जरी खरे असले तरी आपत्ती घडल्यानंतर शासकीय यंत्रणांनी आपत्ती निवारण कक्षातून येणाऱ्या माहितीला प्रतिसाद देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित करण्याट आली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, रोहा उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले,  प्रादेशिक  बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक, नागरी संरक्षण दलाच्या उपनियंत्रक राजेश्वरी गेरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण उर्मिला पवार तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व नगर्पालिकांचे मुख्याधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला.  या आराखड्यानुसार,  जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सामोरे जावे लागते.  जिल्ह्यात दरड कोसळणे या आपत्ती संदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थे मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यास प्राधान्याने लागू करण्यात येत आहे. येत्या 25 मे पर्यंत जिल्ह्याचा प्रत्येक ग्रामपंचायत निहाय व गाव निहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्ह्यात जिल्हानिहाय 1, तालुकानिहाय 15 तसेच ग्रामपंचायत निहाय 803 व ग्रामपंचायत निहाय 1970 आराखडे पुर्ण करावेत असे निर्देश ही यावेळी देण्यात आले.
यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे म्हणाले की, जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रत्येक माहिती नियंत्रण कक्षास दिली जावी. संदेश वहन यंत्रणा प्रभावी असावी, अशा सुचनाही पाणबुडे यांनी केल्या. जिल्ह्यात धबधब्याच्या ठिकाणी कलम 144 लागू करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई करावी. पर्यटनस्थळी मद्यपान करणारांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देशही पाणबुडे यांनी यावेळी दिले.
            यावेळी पनवेल मनपा आयुक्त यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सागर पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक