मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाकरीता भाडेतत्वावर इमारत पाहिजे




 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-  मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची शासकीय इमारत 1986 पासून कार्यान्वीत आहे. या ठिकाणी 80 विद्यार्थींनी वास्तव्य करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्या अहवालानुसार इमारत राहण्यास योग्य नसल्यामुळे मुलींच्या वसतिगृहाकरीता पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्तवावर 6000 चौ.फुट क्षेत्रफळाची इमारतीची आवश्यकता असल्याचे गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अलिबाग यांनी कळविले आहे. यासंदर्भात गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अलिबाग यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक