किटकनाशक हाताळणीः'आत्मा'तर्फे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18-शासनाचा कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.17) 'किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर' याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी  कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, रोहाचे शास्त्रज्ञ डॉ. जिवन आरेकर यांनी किटकनाशक, बुरशीनाशक यांचे प्रकार, त्यांचा सुरक्षित हाताळणी व वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक मंगेश डावरे यांनी किटकनाशकांचा कमीत कमी वापर करुन पिकांचे संरक्षण जैविक पध्दतीने करुन सेंद्रीय शेती करणेबाबत र्मादर्शन केले. तसेच आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे यांनी किटकनाशक वापरण्याच्या पध्दती, किटकनाशकांचा शरीरावर होणारा परिणाम व विषबाधा झाल्यानंतर करावयाच्या प्राथमिक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात शेतकरी मित्र संतोष दिवकर यांनी फवारणी करतांना वापरावयाचे किटचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक मंगेश डावरे, प्रकल्प उपसंचालक डी. एस. चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी पी बी नवले, तालुका कृषि अधिकारी के.जे. जाधव, मंकृअ एम. बी. करे व कृषि सहाय्यक कर्मचारी तसेच परिसरातील 150 शेतकरी उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक