मतदार याद्यांतील संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

 

 

रायगड(जिमाका),दि.26:- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील 25 सप्टेंबर 2023  च्या पत्रानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून ते पुढीलप्रमाणे आहे.

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 27 ऑक्टोबर, 2023 (शुक्रवार),दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 27 ऑक्टोबर, 2023 (शुक्रवार) ते दि.09 डिसेंबर, 2023 (शनिवार),विशेष मोहिमांचा कालावधी-दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दि.4 व 5 नोव्हेंबर 2023 व दि.25 व 26 नोव्हेंबर 2023, दावे व हरकती निकालात काढणे, दि.26 डिसेंबर, 2023 (मंगळवार) पर्यंत, मतदार यादीची शुध्दता तपासणी व अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे,दि.05 जानेवारी, 2024 (शुक्रवार).

पुनरिक्षण उपक्रमानुसार दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 च्या अनुषंगाने सहकार्य करावे. दि.27 ऑक्टोबर 2023 ते दि.09 डिसेंबर 2023 या कालावधीत जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी तसेच VHA Mobile App व व्होटर सर्च पोर्टल द्वारे आपले नांव प्रारूप मतदार यादीत आहे किंवा नाही हे तपासावे तसेच आपण नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशीलाची दुरुस्ती वा वगळणी देखील करु शकता. अधिक माहितीसाठी 1950 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्यात यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक