1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती वा वगळणी करुन घ्यावी


 

रायगड(जिमाका),दि.26:-भारत निवडणूक आयोग यांचे कडील दि. 29 मे 2023 रोजीचे पत्रान्वये राज्यामध्ये मतदार यादीचा दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम - 2024 घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांर्तगत दि.27 ऑक्टोबर ते दि.09 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणीचे फॉर्म न.नं. 6, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती फार्म न.न.8 मध्ये वा वगळणीचे फॉर्म न.न.7 मध्ये अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

तरी 18 वर्षे पूर्ण झालेले पात्र भारतीय नागरिक त्यांच्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालय ( तहसिल कार्यालय) यांच्याशी संपर्क करुन नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती वा वगळणी करु शकतात किंवा Voters.eci.gov.in या संकेतस्थळावरुन तसेच Voter Helpline App द्वारे ऑनलाईन अर्ज करु शकतात.  अधिक माहितीसाठी 1950 या क्रमांकावर संपर्क करु शकता.

नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र पुढीलप्रमाणे :- नवीन मतदार नोंदणी फॉर्म न.न.6 मध्ये अर्ज करणे. समोरच्या बाजूने संपूर्ण चेहरा दिसेल असा पासपोर्ट साईज रंगीत फोटो. वयाचा पुरावा- जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, जन्म दिनांक नमूद असलेले राज्य शिक्षण मंडळाने निर्गमित केलेले दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र, रहिवास पुरावा-पाणी/वीज/गॅस जोडणी चे देयक,आधारकार्ड,राष्ट्रीयकृत/शेडयुल बँक/पोष्टाचे खाते- पुस्तक, भारतीय पासपोर्ट, नोंदणीकृत भाडे करार (भाडयाने रहात असल्यास), नोंदणीकृत विक्री खत (स्वतःचे घर असल्यास), आपल्या यादीभागाच्या नोंदणीसाठी आपल्या कुटुंबातील किंवा शेजारील व्यक्तीचे मतदार ओळखपत्राची झेरॉक्स, सर्व कागदपत्र स्वप्रमाणित करणे आवश्यक.

दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम - 2024 दि.27 ऑक्टोबर, 2023 ते दि. 09 डिसेंबर 2023 या कालावधीत नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणीचे फॉर्म न.नं. 6, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती फार्म न.न.8 मध्ये वा वगळणीचे फॉर्म न.न.7 मध्ये अर्ज स्विकारण्यात येणार आहेत, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक