बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारणीकरिता अलिबाग तालुक्यातील मौजे वरसोली तर श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर येथील शासकीय जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका):- संचालक, पर्यटन संचालनालय यांच्या पत्रान्वये शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटन वाढीसाठी बीच शॅक्स धोरण जाहीर करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, ता.श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहे.

               पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी ध्यास घेतला आहे. त्यापैकी दिवेआगर, ता.श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर बीच शॅक्स प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत बीच शॅक्ससाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.

            त्याचबरोबर बीच शॅक्स उभारणीसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून बीच शॅक्स कार्यान्वित करण्याच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणीसाठी शासकीय जमिनीची मागणी करण्यात आली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.

              त्यानुसार मौजे वरसोली, ता.अलिबाग, जि.रायगड येथील स.नं./हि.नं.6/1/अ, एकूण क्षेत्र 8-22-0 हे.आर. पैकी 1-60-0 हे.आर.क्षेत्र ग्रुप ग्रामपंचायत वरसोली, ता.अलिबाग यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन तसेच मौजे दिवेआगर, ता.श्रीवर्धन येथील गट नंबर 796 क्षेत्र 65.49.00 हे.आर.पैकी दिवेआगर ग्रामपंचायत यांच्याकडे निहीत असलेले 56.23.40 या क्षेत्रापैकी 1.60.00 हे.आर. क्षेत्र ग्रामपंचायत दिवेआगर यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांना बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारणीकरिता तात्पुरत्या स्वरुपात वापर करण्यासे मान्यतेचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच जारी केले आहेत.

                यामुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस अधिकाधिक गती मिळणार असून रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.    

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक