मुरुड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वळके करिता मौजे सातिर्डे येथील शासकीय जागा हस्तांतरित

 


अलिबाग, जि.रायगड दि.29 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.

            त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

             या पार्श्वभूमीवर मुरुड तालुक्यातील येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वळके या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

              त्यानुसार मौजे सातिर्डे, ता.मुरुड, जि.रायगड येथील गट.नं.141, एकूण क्षेत्र 0-80-0 हे.आर. पैकी 0-10-00 हे.आर.क्षेत्र इतकी जमीन महसूल मुक्त व सारामाफीने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड-अलिबाग यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1  वळके करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच जारी केले आहेत.

            मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पशुवैद्यकीय सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे. 

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक