नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली जे.एन.पी.टी.-सिडको परिसराची पाहणी बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्नाबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला दिले आदेश

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे निर्देश दिले.

नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज बुधवार, दि.29 सप्टेंबर 2021 रोजी शिवस्मारक, जे.एन.पी.टी., उरण येथील दास्तान फाटा, द्रोणागिरी सीएफएस येथील पार्किंगच्या जागेची पाहणी केली.  त्यावेळी त्यांनी संबंधित विभागाला ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडको, जेएनपीटी आणि वाहतूक पोलीस यांच्या मदतीने नियोजन करणे आवश्यक आहे. याकरिता टप्य्याटप्प्याने वाहने सोडण्यात येणार असून सीएफएस आणि तालुक्याबाहेर जाणाऱ्या वाहनांना कलर कोड स्टिकर देण्यात येतील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास भेडसावत आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी समन्वय पथक तयार करण्यात आले आहे.  त्याचबरोबर जेएनपीटी आणि दास्तान येथील पार्किंगच्या जागेमध्ये वाहनांची नियोजनबध्द पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल.

 यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, विश्वस्त जे.एन.पी.टी. श्री.दिनेश पाटील, श्री.नरेश रहाळकर, श्री.संतोष ठाकूर, श्री.महादेव घरत, श्री.सदानंदराव भोसले, श्री.बी.एन.डाकी, श्री.गणेश शिंदे, श्री.विनोद म्हात्रे, प्रदीप ठाकूर, के.एम. घरत, अमित भगत, संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, श्री.नितेश पाटील,  श्री.हितेश पाटील, रमेश म्हात्रे, सौ. ममता पाटील, सौ.ज्योती म्हात्रे, सौ.भावना म्हात्रे, सुजाता गायकवाड, तसेच तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, सिडकोचे अधिकारी, जे.एन.पी.टी. चे अधिकारी, पोलीस अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक