जिल्ह्यात 01 ते 07 ऑक्टोबर या कालावधीत अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम

 


 

 अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. 01 ते 07 ऑक्टोबर 2021 या कालावधीत संपूर्ण राज्यात अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातही दि. 01 ते 07 ऑक्टोबर 2021  कालावधीत अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

दि.05 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेला असून त्याची अंमलबजावणी या प्रशानातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे. सर्व जनतेस सकस, ताजे गुणवत्तापूर्ण व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध झाले पाहिजे, हा या कायदयाचा मुख्य उद्देश आहे.

कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थाचे उत्पादन/साठवणूक/वितरण/आयात/विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन 2011 चे कलम 31 (1) व (2) सहवाचन कलम अन्न सुरक्षा व मानदे ( अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी ) नियमन 2011 चे विनियम 2.1.2(1) नुसार अन्न परवाना/नोंदणी घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही अन्न व्यावसायिकाने विनापरवाना/विनानोंदणी व्यवसाय केल्यास विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षापात्र असून कलम 63 नुसार त्यासाठी कमाल 06 महिने कारावास व रूपये 5 लाखापर्यंत दंडाचे प्रावधान आहे.

रायगड जिल्हयातील सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासन म.राज्य, रायगड-पेण या कार्यालयातर्फे कायद्यातील तरतुदीनुसार आपण आपला अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अन्न परवाना/नोंदणी घेवूनच करावा. ज्या अन्न व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखापेक्षा कमी आहे, त्यांनी प्रति वर्ष रूपये 100/- व ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांनी प्रति वर्ष रूपये 2 हजार उत्पादकासाठी प्रतिदिन उत्पादन क्षमता 01 टनापेक्षा कमी असल्यास प्रतिवर्ष रूपये 3 हजार व प्रतिदिन उत्पादन क्षमता 02 टनापेक्षा कमी असल्यास प्रतिवर्ष रूपये 5 हजार याप्रमाणे ऑनलाईन शुल्क भरून foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपआपल्या क्षेत्रातील "आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन म.राज्य, रायगड पेण या कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही.

परवाना/नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या संदर्भात कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन दूरध्वनी कमांक 02143-252085 यावर संपर्क साधावा. या प्रशासनातर्फे विनापरवाना/विनानोंदणी अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.

तरी पुढील संभाव्य कार्यवाही टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व उत्पादक/साठवणूक/वितरक/आयातदार/घाऊक विक्रेत/ किरकोळ विक्रेते/फळे-भाजीपालाविक्रेते/पानटपरीधारक/हातगाडीवाले/फेरीवाले/हॉकर्स तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे भाजी मंडईवाले आठवडी बाजारातील स्टॉलधारक, यात्रेतील स्टॉलधारक, देवस्थान परिसरातील स्टॉलधारक ईत्यादी सर्व लहान-मोठे अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तात्काळ अन्नपरवाने/नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) पदावधित अधिकारी, अन्न्‍ व औषध प्रशासन, म.राज्य रायगड-पेण लक्ष्मण अं.दराडे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक