राज्य परिवहन बसेसमधून प्रवासाकरिता ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टकार्ड नोंदणी करणे आवश्यक

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाकडून दि.01 जानेवारी 2022 रोजी पासून राज्य परिवहन बसेसमधून प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना स्मार्टकार्ड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टकार्ड नोंदणी करून घेण्यात यावी.

दि.31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंतच आपल्या जवळ असलेली प्रचलित ओळखपत्र (आधारकार्ड ) ग्राह्य धरण्यात येवून प्रवास करण्यास मुभा देण्यात येईल.

            दि.01 जानेवारी 2022 पासून हे प्रचलित ओळखपत्र (आधारकार्ड) राज्य परिवहन प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही.  दि.31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंतची देण्यात येणारी मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्य परिवहन महामंडळ, पेण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक