आजादी का अमृत महोत्सव” व “स्वच्छता ही सेवा” स्वच्छ भारत अभियानासाठी सायकल रॅली कार्यक्रम संपन्न

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचे उद्दिष्ट आजादी का अमृत महोत्सवस्वच्छता ही सेवा स्वच्छ भारत अभियान हे होते.

 या सायकल रॅलीमध्ये पनवेल क्षेत्रातील पाच सायकलिंग क्लब म्हणजे पनवेल सायकलिंग क्लब, पुश न पेडल, पेडल सिटी, के के सी सी व रनथॉन क्लबने सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये 100 सायकलींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री.विधाते, पनवेल पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती मोहिते,  पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, इंफिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.आयुफ अकुला, उपाध्यक्ष मुगदा म्हात्रे, सरचिटणीस पवित्र शेरावत व आदी मान्यवर उपस्थित होते.

 या कार्यक्रमाची सुरुवात पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयापासून होवून सांगता जिल्हा परिषद शाळा आदई या ठिकाणी सहभागी क्लबना सर्व सायकलिस्टला सन्मानचिन्ह, मेडल व ट्रॉफी देऊन झाली.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक