आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे यांच्याकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- जिल्हयातील आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहात वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे:-

जिल्हास्तरीय चाचण्या दि.04 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.  वयोगट :- 8 ते 14 वर्षाखालील (फक्त मुले) (दि. 1.1.2022 रोजी वय 8 ते 14 वर्ष असणे आवश्यक राहील), खेळ- अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, मुले- वयोगट 10 ते 14 वर्षे.  

दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. तरी याबाबत सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी शासनाने दिलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करण्याबाबतही सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक श्री. संदिप वांजळे, मो. क्र. 9850954237 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक