जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 



 

                अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 करिता रु. 275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी रु. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार एकूण तरतूदीपैकी 30 टक्के निधी कोविड- 19 वरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त निधीपैकी रु. 27.92 कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून रु. 18.19 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. विकास आराखड्याचे नियोजन करताना जिल्ह्यात राबवावयाच्या विकासकामांसाठी राज्य व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी उपस्थित सदस्यांना दिली.

येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस  पालकमंत्री कु.आदिती तटकरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी,  खासदार सुनिल तटकरे,  खासदार श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरतशेठ गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड, मनोहर भोईर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वृषाली वाघमारे, विकास घरत, दर्शना भोईर, अमृता हरवंडकर, पद्मा पाटील, मोतीराम ठोंबरे, रीना घरत, सायली तोंडलेकर, आरती मोरे, आनंद यादव, अनूसया पादीर, सुधाकर घारे, रेखा दिसले, नम्रता कासार, राजश्री मिसाळ, मंगेश दांडेकर, बबन मनवे, किशोर जैन, चंद्रकांत कळंबे, ॲड.आस्वाद पाटील, प्रियदर्शनी पाटील, बबन चाचले, गीता जाधव, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

    पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण व विकास कामांचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेले दोन वर्ष आपण सर्वजणच कोरोना विरुद्धच्या लढ्यात व्यस्त होतो. मात्र आता कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. जिल्ह्यातील संसर्गही कमी होत आहे. यासाठी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी दिलेले योगदान निश्चितच महत्वाचे आहे. याबद्दल कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सन 2021-22 मध्ये आतापर्यंत रु.26.92 कोटी च्या प्रशासकीय मान्यता देऊन रू.18.19 कोटी वितरीत करण्यात आले असून ऑगस्ट अखेर रू.8.04 कोटी खर्च करण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीमुळे राज्य शासनासमोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनांचा फक्त 10 टक्केच निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत एकूण रू. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे.

उपस्थित सर्व खासदार, आमदार, नियोजन समिती सदस्य व सर्व अधिकारी यांना हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च व्हावा, अशा प्रकारे नियोजन करा, असे आवाहन करुन या कामातून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक यांचे जीवनमान उंचावेल, अशी कामे व्हावीत अशी अपेक्षा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र येऊन काम करुया, जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेऊया, यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मला मिळावे, असेही आवाहन त्यांनी उपस्थित सर्व सदस्यांना केले.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी मंजूर निधी मार्च महिनाअखेर 100 टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश सर्व यंत्रणा प्रमुखांना दिले.   

बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री कु.आदिती तटकरे विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या व्यक्तींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला तसेच  विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवर व्यक्तींच्या दुखवट्याच्या ठरावाचे  वाचन केले व दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग 2020 ची परीक्षा 117 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील श्री.प्रतीक जुईकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला व त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाल्याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अभिनंदनाचाही ठराव मांडण्यात आला.

याचप्रमाणे अलिबाग शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मान.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, खासदार सुनिल तटकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

शेवटी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहू या, असे पुन:श्च आवाहन केले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी उपस्थितांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीबद्दल माहिती देताना सांगितले की, सन 2020-21 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी रु. 234.00 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली होती व तेवढाच निधीहो प्राप्त झाला होता. कोविड 19 च्या अनुषंगाने संपूर्ण निधी जानेवारी 2021 मध्ये उपलब्ध झाल्यानंतर पुढील 3 महिन्यांमध्ये रु. 202.28 कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आला. आढाव्याच्या अनुषंगाने सन 2020-21 मध्ये रु. 101.32 कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 50.1 इतकी दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थांना खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असल्याने खर्च जरी कमी दिसत असला तरी मार्च अखेर 100 टक्के खर्च करण्यासाठी यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड 19 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून रु. 49.36 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी रु. 34.22 कोटी निधी खर्च झालेला आहे.

अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2020-21  साठी रु. 25.64 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली होती. त्यापैको रु. 25.57 कोटी इतका निधी वितरीत करुन 99.7 टक्के इतका निधी खर्च करण्यात आला आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2020-21 साठी रु. 35.98 कोटी निधी प्राप्त होता व त्यापैकी रु. 35.37 कोटी इतका प्रत्यक्ष खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी 98.3 इतकी आहे.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांतर्गत सन 2020-21 मध्ये एकूण रु. 295.62 कोटी निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी रु. 263.83 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून प्रत्यक्ष खर्चाची टक्केवारी 61.5 इतकी आहे.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 करिता रु. 275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी रु. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार एकूण तरतूदीपैकी 30 टक्के निधी कोविड- 19 वरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त निधीपैकी रु. 27.92 कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून रु. 18.19 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी ऑगस्ट अखेर रु. 8.04 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 43.5 इतकी आहे. सन 2020-21 मध्ये कोविड 19 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून आतापर्यंत रु. 27.92 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी रु. 18.19 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे व ऑगस्ट अखेर रु 8.04 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.

अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत सन 2021-22 मध्ये एकूण रु. 25.64 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात त्यापैकी रु.7.69 कोटी इतका प्राप्त झाला आहे.

आदिवासी उपयोजनांतर्गत सन 2021-22 मध्ये एकूण रु. 35.98 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी रु. 10.75 कोटी इतका प्राप्त झाला असून रु. 83.00 लक्ष इतका निधी आत्तापर्यंत वितरीत करण्यात आला आहे.

सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना या तीनही योजना प्रकारांसाठी रु. 336.62 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून रु. 108.34 कोटी निधी प्राप्त झाला कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून ऑगस्ट अखेर रु. 8.87 कोटी इतका निधी खर्च झाला आहे. त्यापैकी रु. 19.31 आहे. प्राप्त तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 45.9 इतकी आहे.

सन 2020-21 व सन 2021-22 चे पुनर्विनियोजन :

नियोजन विभागाच्या शासन निर्णय दि. 25 मार्च 2015 नुसार महसुली व भांडवली योजनांची बचत आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना आहेत. या शासन निर्णयानुसार कोविड- 19 व इतर योजनांच्या बचती व मार्च अखेर मागणीच्या अनुषंगाने सन 2020-21 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण रु.59.12 कोटी रक्कमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये रु. 2.31 कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2020-21  मध्ये रु. 9.85 कोटी रकमेचे पुनर्वनियोजन करण्यात आले. वरील तीनही योजना प्रकारांसाठी एकूण रु. 71.27 कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत कोविड-19 साठी आत्तापर्यंत रु.10.85 कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले आहे. तरी सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत वरील तीनही योजना प्रकारांसाठी केलेल्या पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्ह्यातील उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्यांचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचलन संजय पोईलकर यांनी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक