बँक सखींसाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सात दिवसीय प्रशिक्षण समारोप कार्यक्रम संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, रायगड अलिबाग येथे बँक सखींसाठी आयोजित सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि.28 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.  या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी या प्रशिक्षणातील 39 बँक सखींना बहुमूल्य मार्गदर्शन केले व बँक सखींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे (RSETI) संचालक श्री.राठोड, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या मिना माळी यांनी केले. शेवटी प्रशिक्षणार्थी बँक सखींना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.    

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक