हवामानावर आधारित फळपिक विमा योजना

दिनांक :- 07 डिसेंबर 2016                                                    लेख क्र.62
हवामानावर आधारित फळपिक विमा योजना

कमी, जास्त पाऊस,पाऊसाचा खंड,वेगाचा वारा, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित रहावे. या उद्देशाने हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेची माहिती देणारा लेख..

ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम  असा मर्यादित ठेवण्यात आला  आहे.  पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स या कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.  सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र राहतील.    या योजनेत आंबा व काजू ही पिके अधिसूचित करावयाची आहेत.  या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधी पर्यंत विमा संरक्षण देण्यात येईल.
फळपिके :- काजू-समाविष्ट धोके-अवेळी पाऊस,कमी तापमान विमा संरक्षण कालावधी-1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 तसेच गारपीटसाठी- 1 जानेवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 आहे.    आंबा:- अवेळी पाऊस-1 जानेवारी 2017  ते 15 एप्रिल 2017, कमी तापमान, 1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 अवेळी पाऊस-16 एप्रिल 2017 ते 15 मे 2017 जास्त तापमान- 15 मार्च 2017 ते 31 मे 2017 गारपीट -1 जानेवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 असा आहे.
विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान- या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे.   तथापि शेतकऱ्यांनी फळपीक  निहाय प्रति हे विमा दर पुढीलप्रमाणे आहेत.  1) बहार- आंबिया पीके-आंबा,काजु, शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता-विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के.
विमा कंपनीकडून पीक निहाय प्रति हेक्टर प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता या मधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल.   हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल.
योजना अंमलबजावणी वेळापत्रक :- कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचे घोषणापत्र (Declaration) संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे याबाबत आंबिया बहराचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.  1.) बँकेकडून अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकऱ्यांचा फळपिकांचा विमाप्रस्ताव (प्रपोजल) बँकांना सादर करणेची मुदत-फळपीक-काजू,आंबा साठी 30 नोव्हेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2016.  बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांची घोषणा पत्र (डिक्लेरेशन) संबंधीत विमा कंपनीस सादर करण्याची मुदत-फळपीक-काजु-20 डिसेंबर 2016.   आंबा पिकासाठी 19 जानेवारी 2017 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी  विमा प्रस्ताव (प्रपोजल) बँकांना सादर करण्याची मुदत.-फळपीक- काजू,आंबा 30 नोव्हेंबर 2016 ते 31 नोव्हेंबर 2016
फळपिकनिहाय विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची विमा दर रक्कम. पिकाचे नाव-काजू,आंबा-विमा संरक्षित रक्क्म अनुक्रमे- 76,000/- 1,10,000/-शेतकरी हिस्सा- अनुक्रमे-3800/- 5500/- शेतकऱ्यांकरिता विमा दर-% (विमासंरक्षित रक्कमेच्या ) प्रत्येकी- 5% विम्याची कंपनी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीकडून .
आंबा पीक विमा संरक्षण
आंबा पिकासाठी विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी) अवेळी पाऊस यासाठीचा कालावधी 1 जानेवारी 2017 ते 15 एप्रिल 2017 पर्यंत असून प्रमाणके व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये पुढील प्रमाणे आहे. कोणत्याही 1 दिवस 5 मि.मि. किंवा  त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 9 हजार देय.  कोणत्याही सलग 2 दिवस 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा पाऊस झाल्यास रक्कम रुपये 13 हजार 300 देय.  कोणत्याही सलग 3 दिवस 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 22 हजार देय. (कमाल देय रक्कम रुपये 22,000/-).
            कमी तापमान कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 : कोणत्याही सलग 3 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 3 हजार 900 देय.  कोणत्याही सलग 4 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 7 हजार 800 देय.  कोणत्याही सलग 5 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 11 हजार 100 देय.    कोणत्याही सलग 6 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 15 हजार  देय.   कोणत्याही सलग 7 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 22 हजार  देय.  (कमाल देय रक्कम रुपये 22,000/-).
            अवेळी पाऊस यासाठीचा कालावधी 16 एप्रिल 2017 ते 15 मे 2017 पर्यंत कोणत्याही 1 दिवस 10 मि.मि. किंवा  त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 8 हजार 900 देय.  कोणत्याही सलग 2 दिवस 10 मि.मि. किंवा त्यापेक्षा पाऊस झाल्यास रक्कम रुपये 13 हजार  देय.  कोणत्याही सलग 3 दिवस 10 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 22 हजार देय. (कमाल देय रक्कम रुपये 22,000/-).
जास्त तापमान कालावधी 15 मार्च 2017 ते 31 मे 2017 : कोणत्याही सलग 2 दिवस 37.5 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 11 हजार 100 देय.  कोणत्याही सलग 3 दिवस 37.5 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 22 हजार 200 देय.  कोणत्याही सलग 4 दिवस 37.5  डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 33 हजार 300 देय.    कोणत्याही सलग 5 दिवस 37.5  डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 44 हजार  देय.   (कमाल देय रक्कम रुपये 44,000/-).  एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 1 लाख 10 हजार. तसेच गारपीट कालावधी 1 जानेवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 असून विमा संरक्षित रक्कम रुपये रु.36 हजार 700 आहे.
काजू पीक विमा संरक्षण
काजू पिकासाठी विमा संरक्षण प्रकार हवामान धोका व कालावधी अवेळी पाऊस यासाठीचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत असून प्रमाणके व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये पुढील प्रमाणे आहे. कोणत्याही 1 दिवस 5 मि.मि. किंवा  त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 10 हजार देय.  कोणत्याही सलग 2 दिवस 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त  पाऊस झाल्यास रक्कम रुपये 20 हजार देय.  कोणत्याही सलग 3 दिवस 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 35 हजार देय. कोणत्याही सलग 4 दिवस 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रुपये 50 हजार देय. (कमाल देय रक्कम रुपये 50,000/-).
            कमी तापमान कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 : कोणत्याही सलग 3 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 10 हजार 400 देय.  कोणत्याही सलग 4 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 15 हजार 600 देय.  कोणत्याही सलग 5 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम  रुपये 26 हजार  देय.      (कमाल देय रक्कम रुपये 26,000/-). एकूण विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी रुपये 76 हजार. तसेच गारपीट कालावधी 1 जानेवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 असून विमा संरक्षित रक्कम रुपये रु.25 हजार 300 आहे.
000000
                                                                              संकलन
                                                                                जिल्हा माहिती कार्यालय
                                                                                 रायगड-अलिबाग


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक