झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक-- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

 झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक
                                -- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले




            अलिबाग दि.29:- (जिमाका)  रायगड जिल्ह्याला झाडे लावण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे व लावलेल्या झाडांचे संगोपन करुन ती झाडे जास्तीत जास्त प्रमाणात जगवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वर्षनिहाय नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करणे याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या.
            या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विद्याधर झुकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमेश पाटील, रोहा विभागाचे सहाय्यक वन संरक्षक दिपक सावंत, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, वृक्षलागवड कार्यक्रमात जनसहभाग वाढवून या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करावा.   वृक्षलागवड करताना त्यामध्ये वड,पिंपळ,जांभूळ,आवळा, बदाम इत्यादी फळझाडांची जास्तीत जास्त लागवड करावी.  जेणेकरुन लोकांना उपजिविकेची आणि उत्पादनाची साधने उपलब्ध होऊ शकतील.   तसेच सर्व विभागांनी लावलेली व जगविलेल्या झाडांची आकडेवारी संबंधित विभागाला देणे.  नरेगाचा अधिकाधिक वापर करुन  झाडे लावणे तसेच गट लागवडीलाही प्राधान्य देऊन एन.एस.एस.चे विद्यार्थी आणि  शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा.    जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना  दिलेले उद्दीष्ट त्यांनी पूर्ण करावे. पुढील वर्षासाठी झाडे लावण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना यावेळी दिल्या.
            बैठकीच्या प्रारंभी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विद्याधर झुकर यांनी स्वागत करुन  संगणकीय सादरीकरणाव्दारे सविस्तर  माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक