पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:- 27/12/2016                                                                                                               वृत्त क्र. 833
 पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे
                                                                                           ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले


        अलिबाग दि.27 :- (जिमाका) जिल्ह्यातील बँकांनी  त्यांना दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या  जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या त्रैमासिक बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रिजर्व्ह बँकेचे व्यवस्थापक सी.कार्तिक, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक गिरीशकुमार सिंग, लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधूसुदन, नाबार्ड बँकेचे असिटंड जनरल मॅनेजर सुधाकर रगतवान, रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक तसेच विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत  बँकानी त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी 91 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.  आर्थिक वर्षाअखेर  पर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे.  शेतकरी खातेदाराला कर्ज वितरीत करता यावे यासाठी नोटाबंदी नंतर पैशाची कमतरता असली तरी  जिल्हा सहकारी बँकेला त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणात स्टेट बँकेने कॅश उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी.   बँकेने  कॅशलेस गावे करण्यासाठी  निवडलेल्या गावात ग्रामसभेला उपस्थित राहून कॅशलेस व्यवहारा संदर्भात जनतेमध्ये जागृती करण्याचे काम करावे. तसेच बँकेने स्वतंत्रपणे शिबीरे आयोजित करुन  जनजागृती करावी.  तरच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जनतेकडून प्रतिसाद मिळेल व कॅशलेस गावे करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.  पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषि विभागाने विशेष  प्रयत्न करावेत.  पेन्शन धाराकांची बँक खाती  आधार कार्डाशी जोडण्याचे काम येत्या 15 जानेवारी 2017 पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राष्ट्रीयकृत बँकानी 93 टक्के, खाजगी बँकानी 74 टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 64 टक्के, आरडीसीसी बँकेने 92 टक्के असे सर्व बँकांनी मिळून 91 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधूसुदन यांनी विविध बँकाच्या त्रैमासिक कामाची माहिती सादरी करणाद्वारे देताना सांगितली.  नाबार्ड बँकेने तयार केलेल्या संभाव्यतायुक्त ऋण योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक