विशेष लेख: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत “हर घर झंडा” अर्थात “राष्ट्रध्वजाभिमान” (भाग 1)

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तशा सविस्तर सूचना केंद्र शासनाने कळविल्या आहेतच. त्यानुसार राज्यात या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत विविध शासन निर्णय/शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि.11 ऑगस्ट 2022 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात हर घर झंडा हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना वाचकांसाठी एकत्रितरित्या या लेखाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

1) सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणांनी प्रसारमाध्यमातून देशाभिमान व जाणीव-जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी.

2) दि.11 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे.

3) नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करावे.

4) राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.

5) केंद्रीय गृह विभाग यांच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-१ मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सूत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल.

6) संगीतातूनही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येईल.

7) हर घर झंडा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी.

8) या उपक्रमामध्ये राज्य / देशातील / परदेशातील सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्यावी.

9) राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होण्याबाबत संबंधित यंत्रणांनी खात्री करावी.

10) ऑनलाईन व ऑफलाईन राष्ट्रध्वज विक्री केंद्र राज्याने उपलब्ध करून द्यावे.

11) भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव-जागृती करावी.

12) हर घर झंडा या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रण इ. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावे.

13) नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत रुची निर्माण करण्यासाठी वेबसाईट, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात यावा.

14) स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा.

याबाबतचा मार्गदर्शक कृती आराखडा जाणून घेऊ या पुढील लेखात…

 


मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक