कोविड-19 च्या वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे आवाहन

 

अलिबाग,दि.24 (जिमाका):- रायगड जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्ण संख्येत  पुन्हा एकदा सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. दि.24 जून 2022 रोजी 24 तासांमध्ये 317 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज रोजी एकूण 1 हजार 097 ॲक्टिव्ह रुग्ण असून सौम्य व माध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले 13 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने जिल्ह्याधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे तसेच स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वतःची व इतरांची काळजी घावी तसेच कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी SMS (S for सामाजिक अंतर, M for माक्सचा वापर, S for सॅनिटाझरचा वापर) या पॉलिसीचा अवलंब करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी करोनापासून आपला बचाव करण्यासाठी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. सर्व पात्र 12 ते 14 वर्षाचे मुलांनी म्हणजेच ज्यांचा जन्म 2008, 2009 व 15 मार्च 2010 पर्यंत झालेला आहे अशा मुलांनी Corbevax चे दोन डोस घेण्याचे आहेत. तसेच 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनी Covaxin लसीकरण चे दोन्ही डोस घेण्याचे आहेत व इतर नागरिकांनी म्हणजेच 18 वर्ष व त्यावरील नागरिकांनी कोविशिल्ड किंवा कोवक्सिन चे 2 डोस पूर्ण करून घ्यावेत.

तसेच 60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस पूर्ण झाल्यानंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असल्यास व त्यांना 3 महिन्यामध्ये कोविड संसर्ग झालेला नसल्यास त्यांनी प्रिकॉशनरी (बुस्टर) डोस पूर्ण करून घ्यावा. त्याचबरोबर 18 ते 59 वर्षातील नागरिकांनी प्रिकॉशनरी (बुस्टर) डोस घेण्याचा असल्यास व दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असल्यास त्यांनी खाजगी लसीकरण केंद्रावर जाऊन त्यांचे डोस पूर्ण करून घ्यावेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक