ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत महापंचायतराज अभियान संपन्न


अलिबाग,दि.24 (जिमाका):- ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन पंचायत समिती, रायगड व जिल्हा परिषद यांच्यामार्फत महापंचायत राज अभियान राबविण्यात आले.

या अभियानाचा साळवे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या, साळवे आदिवासी वाडी, पानोसे, पानोसे आदिवासी वाडी, पानोसे कोंड इत्यादी ग्रामस्थांनी लाभ घेतला.

यावेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.वाय. प्रभे, सरपंच मंगल कोळी, उपसरपंच तटगुरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी श्री.गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्री.काप व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवलीचे कर्मचारी वृंद, अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होते.

गटविकास अधिकारी श्री.प्रभे आरोग्य, शिक्षण उपजीविका यावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, कागदपत्रे व शासकीय लाभ मिळण्याकरिता धडपड करून आपण रोजगार हमी व पायाभूत सुविधा परिपूर्ण करून स्वयंपूर्ण व्हावे. महिलांनी हिमोग्लोबिनवर लक्ष द्यावे व आवश्यक तो पूरक आहार खाऊन सुदृढ राहावे. जलअमृत योजनेंतर्गत तलावामधून गाळ काढून घ्यावा. तसेच आपले कोकण सदैव हरित सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने निसर्ग जपावा व वृक्षारोपण करावे. तसेच साळवे ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

यावेळी विस्तार अधिकारी श्री.गायकवाड यांनी ग्रामपंचायत मार्फत दिले जाणारे लाभ व महापंचायत राज अभियान आझादी का अमृतमहोत्सव हे अभियान पूर्ण देशभर सुरू असून या लाभांपासून कोणीही वंचित राहू नये, असे आवाहन केले.

कृषी अधिकारी श्री.काप यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते के.वाय.सी याबद्दल उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली व पानोसे गावातून पी.एम.किसान (PM-KISAN) योजनेचा जास्त सहभाग असल्याने लाभार्थ्यांनी वेळेत के.वाय.सी प्रमाणीकरण पूर्ण करून लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

महापंचायत राज अभियान शिबिरात खालील अर्ज भरुन घेतले व ग्रामस्थांनी सेवांचा लाभ घेतला.

1) कोविड लसीकरण बूस्टर डोस- 32

2) आधारकार्ड नोंदणी अर्ज कोणताही पुरावा नसलेल्या अर्ज संख्या - 69 लाभार्थी

3) प्रधानमंत्री किसान सन्मान दुरुस्ती- 02

4) उत्पन्न दाखला अर्ज- 3

5) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- 03

6) पॅन कार्ड- 12

7) जॉब कार्ड- 06

8) पती पत्नी संयुक्त नावे -20

यावेळी सर्व ग्रामस्थांनी, ग्रामविकास समिती व ग्रामपंचायतने शासन व स्वदेस फाऊंडेशनचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका श्रीमती सरिता दपके यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक