कृषी उत्पादन निर्यातवाढीकरिता कार्यशाळा संपन्न


 

अलिबाग,दि.24 (जिमाका):- निर्यात केंद्र म्हणून विकसीत करून निर्यात वृध्दीकरिता जिल्हा निर्यात प्रचलन समिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग व कृषी विभाग अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSET) अलिबाग येथे (दि.22 जून 2022) रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेकरिता अपेठा (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) या संस्थेचे सहाय्यक संचालक श्री.प्रशांत वाघमारे, उद्योग सह संचालक कोकण विभाग ठाणे श्री.सतीश भामरे हे उपस्थित होते.

जिल्ह्यातील स्थानिक साधन संपत्तीचा व भौगोलिक मानांकित चिन्ह प्राप्त अलिबागचा पांढरा कांदा व आंबा उत्पादन या घटकाच्या निर्यात वाढीकरिता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्र-अलिबाग मार्फत करण्यात येईल व जिल्हा कृती आराखडयात या गोष्टीचा समावेश करण्यात आल्याची माहिती महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पी.एस.हरळय्या यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. तसेच कृषी विभागाकडून कृषी माल निर्यातीकरिता आवश्यक ते सहाय्य करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी अवगत केले.

कृषी माल निर्यातीकरिताची प्रक्रिया जागतिक उपलब्ध बाजारपेठ निर्यात विषयक कार्यपध्दती कृषी मालाची जागतिक स्तरावरील प्रसिद्धी याकरिताच्या माहितीचे सादरीकरण "अपेडा" या संस्थेचे सहाय्यक संचालक प्रशांत वाघमारे यांच्याकडून करण्यात आले.

यानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे कृषी माल निर्यातीकरिताच्या शंकांचे निरसन चर्चेद्वारे करण्यात आले.

कृषी प्रक्रिया उद्योग व उद्योग विभागाकडील आर्थिक अनुदानासंबंधी शासकीय योजना तसेच शेतकऱ्यांनी व्यापारी पध्दतीने कृषी उत्पादन घेवून उपलब्ध बाजारपेठेच्या माध्यमातून स्वत:चा अधिक लाभ करुन घ्यावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक, कोकण विभाग ठाणे श्री.सतीश भामरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

रायगड जिल्ह्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी व आंबा उत्पादक शेतकरी यांची या कार्यक्रमात मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित शेतकऱ्यांना वित्तीय व्यवस्थापन विषयी नाबार्डचे महाव्यवस्थापक प्रदिप अपसुंदे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी माल प्रक्रिया उद्योग विषयक अधिक माहितीकरीता जिल्हा उद्योग केंद्र रायगड कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक