बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ आगस्ट पर्यंत मुदतवाढ
रायगड(जिमाका)दि.06:- सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा”चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषि सहसंचालक (वि.प्र.2.)कृषि आयुक्तालय, पुणे सुनिल बोरकर यांनी दिली आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देउन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
कृषी यांत्रिकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यानी mahadbt.maharashtra.gov.in far
००००००००
Comments
Post a Comment