गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी अर्ज करावेत


 

रायगड (जिमाका) दि.9 :- पशुसंवर्धन विभागांतर्गत सन 2024-25  मध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत सुधारित गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी या योजनेतून कर्जत, पनवेल, खालापूर व रोहा  या  चार तालुक्यातून पात्र  गोशाळांची निवड करण्यात आली असल्याने हे तालुके वगळून जिल्ह्यातील उर्वरीत  11 तालुक्यातून सन 2024-25  करिता पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज व परिपूर्ण प्रस्ताव  दि.25 ऑगस्ट 2024 पर्यंत संबधित तालुक्याच्या  पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे  सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन रायगड डॉ. सचिन देशपांडे  यांनी केले आहे.

महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्यामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी पात्र गोशाळांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योजनेचे उद्देश, वेळापत्रक गोशाळा लाभार्थी निवडीच्या अटी / शर्ती. निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज व इतर जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे तसेच मार्गदर्शक सूचना इ. बाबतची सविस्तर माहिती संबधीत तालुक्याच्या  पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे  उपलब्ध करून देणेत आलेली आहे .आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडे थेट किंवा ईमेल ‌द्वारे सादर केलेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत.

०००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक